बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचे प्रकरण

टोरंटो (कॅनडा) – बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात कॅनडातील भारतीय वंशांच्या हिंदूंनी टोरंटो येथील बांगलादेशाच्या दूतावासाच्या बाहेर निदर्शने केली. निदर्शने करणार्या हिंदूंनी सांगितले की, आम्ही कॅनडाचे हिंदू येथील बांगलादेशाच्या दूतावासासमोर निषेध करण्यासाठी जमलो आहोत. आम्ही निषेध करत आहोत; कारण यावर्षी ३ ऑगस्टपासून बांगलादेशात काय घडत आहे ते आम्ही पाहिले आहे. बांगलादेशाने अल्पसंख्यांकांची, हिंदूंची हत्या थांबवावी, अशी आमची इच्छा आहे.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि आता बांगलादेश येथून नष्ट होऊ !
आंदोलनातील बांगलादेशी वंशाच्या एका महिलेने सांगितले की, बांगलादेशातील पीडितांविषयी आम्हाला सहानुभूती आहे. तेथील अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार थांबवण्याची आवश्यकता आहे. हिंदू अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथून नामशेष झाले आहेत. जर आम्हाला आता वाचवले नाही, तर आम्ही बांगलादेशातूनही नामशेष होऊ. ही आमची भूमी होती, आमच्या १४ पिढ्यांचा जन्म तिथे झाला होता.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंसाठी जगभरातील हिंदू संघटित होत आहे, हे कौतुकास्पद आहे. भारतातील जन्महिंदूंनी यातून बोध घ्यावा ! |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan