पंजाबमध्ये संघाच्या स्वयंसेवकाची हत्या करणार्‍या खलिस्तानवाद्यांना ब्रिटनमध्ये अटक आणि जामिनावर सुटका

भारतात कुणीही येऊन भारतीय नागरिकाची हत्या करून पुन्हा पसार होतो, हे भारताला लज्जास्पद !

जर्मनीमध्ये ख्रिस्त्यांच्या ‘चिल्ड्रन होम’मध्ये पाद्री आणि नन यांच्याकडून लहान मुलांचे लैंगिक शोषण

पाद्रयांकडून होणार्‍या लैंगिक शोषणामुळे आणि तेथे मनःशांती न मिळत असल्याने आज पाश्‍चात्त्य देशांतील चर्च ओस पडू लागले आहेत. मोठ्या प्रमाणात तेथील ख्रिस्ती हिंदु धर्माकडे आकर्षित होत आहेत; मात्र भारतीय प्रसारमाध्यमे याकडे दुर्लक्ष करत आहेत ! 

पोप फ्रान्सिस यांच्या इंस्टाग्राम खात्यावरून पुन्हा बिकिनी घातलेल्या मॉडेलचे छायाचित्र ‘लाईक’ !

असे हिंदूंच्या संतांच्या सामाजिक माध्यमांवरील खात्याविषयी झाले असते, तर प्रसारमाध्यमांनी त्यांची हेटाळणी करत अपकीर्ती केली असती; मात्र अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंविषयी प्रसारमाध्यमे ढोंगी निधर्मीवादाचा बुरखा घालून पत्रकारिता करतात !

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा वाढता संसर्ग

ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिथे दळणवळण बंदी अधिक कडक करण्यात आली आहे. हा ‘स्ट्रेन’ (विषाणू) नियंत्रणाबाहेर असल्याचे तेथील प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे युरोपीय देश सतर्क झाले आहेत.

पाक नागरिकांना ‘आतंकवादी’ म्हटल्यावरून ‘रिपब्लिक भारत’ वाहिनीला १९ लाख ७३ सहस्र रुपयांचा दंड

पाकमधील २२ कोटी मुसलमांना आतंकवादी संबोधल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरून दखल घेतली जाते; मात्र भारतात १०० कोटी हिंदूंना वारंवार आतंकवादी संबोधले जाऊनही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणी अवाक्षरही काढत नाही !

ब्रिटनमध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे धर्मांधांकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण

‘लव्ह जिहाद’ची कित्येक प्रकरणे सर्रास घडत असूनही ‘लव्ह जिहाद कुठे आहे ?’ हा प्रश्‍न विचारणारे डोळे असूनही आंधळेच होत ! त्यामुळेच उत्तरप्रदेश शासनाप्रमाणेच केंद्र सरकारनेही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !

हिंदु धर्माचा जगभर प्रसार करणारे जय लखानी कालवश

हिंदु धर्माचा जगभर प्रसार करणारे जय लखानी (वय ७२ वर्षे) यांचे ५ डिसेंबर २०२० या दिवशी लंडन येथे देहावसान झाले. जय लखानी यांचा जन्म केनियाच्या मोम्बासा येथे वर्ष १९४८ मध्ये झाला होता. त्यांचे बालपण टांझानियाच्या दारेसलाममध्ये गेले. वर्ष १९६४ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी ते लंडनला आले आणि पुढील शिक्षण घेतले.

फ्रान्सने बनवला इस्लामी कट्टरतावादाला रोखणारा मसुदा !

लवकरच कायद्यात रूपांतर करणार ! फ्रान्सचे करू शकतो, ते गेली ३ दशके जिहादी आतंकवाद आणि कट्टरतावाद यांमुळे पीडित असलेला भारत का करू शकत नाही ?

आतंकवादी झकीऊर रेहमान लखवी याला प्रतीमहा दीड लाख रुपये खर्चासाठी देण्यास संयुक्त राष्ट्रांची पाकला अनुमती

संयुक्त राष्ट्रांनी एकीकडे आतंकवाद निपटण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसर्‍या बाजूने अशा प्रकारे आतंकवाद्यांना सहानुभूती दाखवायची, हे संतापजनक होय.

ब्रिटनमध्ये दोघांवर अ‍ॅलर्जीमुळे कोरोना लसीचा दुष्परिणाम

ब्रिटनमध्ये फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली कोरोनावरील लस देण्याला प्रारंभ झाला असतांना या लसीमुळे दोघांची प्रकृती बिघडली आहे. हे दोघेही जण  आरोग्य कर्मचारी आहेत.