वर्षाच्या शेवटपर्यंत कोरोना महामारी संपेल, असे समजणे चुकीचे ! – जागतिक आरोग्य संघटना

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – कोरोना लसीकरणामुळे बाधितांच्या आणि मृतांच्या संख्येत घट होईल; मात्र ‘या वर्षाच्या शेवटीपर्यंत तरी कोरोनापासून सुटका होईल’, असे समजणे चुकीचे ठरेल, असे जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन कार्यक्रमाचे संचालक डॉ. मायकल रायन यांनी म्हटले आहे.

रायन पुढे म्हणाले की, देशांनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर आपण सतर्क असू, तर वर्षाच्या शेवटपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात भरती होणारे होणारे बाधित, त्यांचा मृत्यू आणि महासाथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या समस्या यांचा अंत करू शकतो.