लंडनजवळ दुसर्‍या महायुद्धातील ९०० किलोचा बॉम्ब सापडला !

लंडन (ब्रिटन) – लंडनच्या जवळील एक्सेटर शहरामध्ये दुसर्‍या महायुद्धातील ९०० किलोचा जिवंत बॉम्ब सापडल्यानंतर त्याला निकामी करण्यासाठी येथील संपूर्ण परिसर रिकामी  करण्यात आला. हा बॉम्ब इतका शक्तीशाली होता की, तो निकामी करतांना झालेल्या स्फोटाचा आवाज १० किमी अंतरापर्यंत ऐकू गेला.

तसेच यामुळे स्फोट झालेल्या परिसरातील इमारतींची हानी झाली. त्यांची दुरुस्ती केल्यावर नागरिकांना तेथे परत जाऊ दिले जाणार आहे. हा बॉम्ब जर्मनीच्या वायूदलाने टाकला होता, अशी माहिती देण्यात आली आहे; मात्र त्याचा स्फोट झाला नव्हता.