सीरिया सुरक्षित झाल्याचे सांगत डेन्मार्कमधून शरणार्थींची त्यांच्या देशात रवानगी !

डेन्मार्क त्याच्या देशातील शरणार्थींना परत मायदेशी पाठवतो; मात्र भारत घुसखोरी करून आलेल्या बांगलादेशी आणि रोहिग्या यांना त्यांच्या देशात पाठवू शकत नाही, हे भारताला लज्जास्पद !

कोपनहेगन (डेन्मार्क) – डेन्मार्क सरकारने शरणार्थी म्हणून आलेल्या सीरियातील नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्यास प्रारंभ केला आहे. ‘सीरियातील शरणार्थींना पुन्हा मायदेशी पाठवण्यास तेथील परिस्थिती चांगली आहे’, असे डेन्मार्क सरकारने म्हटले.

डेन्मार्क सरकारने ९२ शरणार्थींकडून डेन्मार्कमध्ये रहाण्याचा परवाना काढून घेतला आहे. सीरियाची राजधानी दमास्क आणि त्याच्या आजूबाजूचे क्षेत्र सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे; मात्र मानवाधिकार संघटनांनी डेन्मार्क सरकारवर अप्रसन्नता व्यक्त केली आहे. शरण आलेल्या निर्वासितांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याची घोषणा करणारा डेन्मार्क हा पहिला युरोपीय देश आहे.


डेन्मार्कचे इमिग्रेशन मंत्री मॅटियास टस्फे यांनी मागील मासामध्ये म्हटले होते की, सीरियातून येणार्‍या निर्वासितांसाठी डेन्मार्कने प्रामाणिक आणि मोकळी भूमिका घेतली. सीरियाच्या निर्वासितांना परमिट देतांना हे परमिट कायमस्वरूपी नसून काही कालावधीसाठी असल्याची कल्पना त्यांना देण्यात आली होती. परमिट काढून घेण्यात आलेल्या सीरियाच्या नागरिकांनी देश न सोडल्यास त्यांना डिटेंशन कॅम्पमध्ये पाठवण्यात येणार; मात्र त्यासाठी सक्ती केली जाणार नाही.