पाक ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या करड्या (ग्रे) सूचीमध्ये कायम !

पाकचे जिहादी आतंकवाद्यांना मिळणारे साहाय्य पहाता त्याला काळ्या सूचीत घालणेच योग्य ठरणार आहे !

पॅरिस (फ्रान्स) – आतंकवाद्यांना आर्थिक साहाय्य केल्यावरून जून २०१८ पासून पाकिस्तानला ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ने (एफ्.ए.टी.एफ्.ने) करड्या सूचीमध्ये (‘ग्रे लिस्ट’मध्ये ) टाकले आहे. या संघटनेच्या येथे झालेल्या बैठकीमध्ये त्याला या सूचीमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने पाकिस्तानला दिलेल्या २७ पैकी ३ निकष पूर्ण करण्यास अपयश आले. त्यानंतर हा निर्णय घेतला.

एफ्.ए.टी.एफ्.चे प्रमुख मार्कस प्लीयर म्हणाले की, पाकिस्तानवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. आतंकवाद्यांना होणारे आर्थिक साहाय्य रोखण्यासाठी पाकने काही पावले उचलली आहेत; मात्र ती पुरेशी नाहीत.