पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील २६ कार्यालयांवर ईडीच्या धाडी

केंद्र सरकारने लवकरात लवकर या जिहादी संघटनेवर बंदी घातली पाहिजे, अशीच हिंदूंची मागणी आहे !

गोव्यात दिवसभरात ९४ कोरोनाबाधित

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाच्या १ सहस्र २९७ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी ९४ जण कोरोनाबाधित आढळले. दिवसभरात १२४ रुग्ण बरे झाले.

माता अमृतानंदमयी यांच्या चेन्नई येथील आश्रमाचे स्वामी विनयमर्थ चैतन्य यांनी दिले सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद !

सनातन संस्थेचे साधक श्री. जयकुमार आणि सौ. सुगंधी जयकुमार यांनी येथील माता अमृतानंदमयी आश्रमात स्वामी विनयमर्थ चैतन्य यांची १ डिसेंबर या दिवशी साधकांनी भेट घेतली. या वेळी स्वामीजींना सनातन संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली.

रेखा जरे हत्या प्रकरणात पत्रकारानेच सुपारी देऊन केली हत्या !

रेखा जरे यांची हत्या ३० नोव्हेंबरच्या रात्री धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून करण्यात आली. पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ‘शिक्षित’ मतदारांकडून अयोग्य पद्धतीने मतदान केल्याने सहस्रो मते अवैध

योग्य पद्धतीने मतदानही करू न शकणार्‍या मतदारांना शिक्षित म्हणायचे का ?

पुणे, नागपूर आणि संभाजीनगर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी : भाजपला पराभवाचा धक्का !

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पुणे, नागपूर आणि संभाजीनगर मतदार संघात भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव केला आहे.

ठाणे येथील मंदिराची दानपेटी फोडणार्‍या दोघांना अटक

येथील मानपाडा भागात असलेल्या सिद्धीविनायक मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रक्कम चोरणार्‍या अजय जयस्वार (वय २२ वर्षे) आणि सलमान खान (वय २० वर्षे) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली.

अन्वेषणात कुचराई करणार्‍या अमली पदार्थविरोधी पथकाच्या २ अधिकार्‍यांचे निलंबन

अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबई क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

पंढरपूरकरांना आजपासून सकाळी ६ ते ७ या वेळेत श्री विठ्ठल दर्शन

पंढरपूरकरांना ५ डिसेंबरपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन सकाळी ६ ते ७ या वेळेत ‘आगाऊ’ नोंदणी न करता थेट घेता येणार आहे. पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांना रहिवासी असल्याचा पुरावा दाखवणे आवश्यक आहे, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. विठ्ठल जोशी यांनी सांगितले.