माता अमृतानंदमयी यांच्या चेन्नई येथील आश्रमाचे स्वामी विनयमर्थ चैतन्य यांनी दिले सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद !

चेन्नई – सनातन संस्थेचे साधक श्री. जयकुमार आणि सौ. सुगंधी जयकुमार यांनी येथील माता अमृतानंदमयी आश्रमात स्वामी विनयमर्थ चैतन्य यांची १ डिसेंबर या दिवशी साधकांनी भेट घेतली. या वेळी स्वामीजींना सनातन संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. या वेळी स्वामीजींना ‘सनातन पंचांग २०२१’ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. सनातन पंचांग पाहून स्वामीजी प्रसन्न झाले आणि ‘सनातनचे साधक सेवाभावाने साधना करतात’, असे सांगून आनंद व्यक्त केला.