पेठभाग, सराफकट्टा, हरभट रस्ता येथील वाहनतळ समस्या सोडण्यासाठी उपाययोजना करा ! – भाजपच्या वतीने महापालिका प्रशासनास निवेदन

निवेदनात म्हटले आहे की, भावे नाट्यमंदिर समोरचे महापालिकेचे असलेले वाहनतळ हे दुचाकी वाहनांसाठी खुले करावे.

चित्रपटातील ‘आयटम डान्स’, अश्‍लील चित्रपटे बलात्काराची मानसिकता निर्माण करतात ! – राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी

बलात्कार्‍यांना कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना घडतात. यांसह समाजामध्ये नैतिकता निर्माण करण्यासाठी त्याला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. साधना शिकवली असती, तर असे घडले नसते !

अमेरिकेतील ‘शीख फॉर जस्टिस’ या फुटीरतावादी संघटनेकडून भारतीय सैन्याातील शीख सैनिकांना बंडासाठी चिथावणी

‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेला पाकचे साहाय्य आहे. भारतातील सर्व प्रकारच्या आतंकवादी कारवाया कायमस्वरूपी रोखण्यासाठी पाकला नष्ट करणेच योग्य !

तुर्कस्तानकडून सीरियातील १०० आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण !

भारताने तुर्कस्तानशी सर्व प्रकारचे राजनैतिक आणि व्यापारी संबंध तोडून त्याच्यावर बहिष्कारच घातला पाहिजे आणि काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकवर सैनिकी कारवाई केली पाहिजे !

चीनने नियंत्रणरेषेवर उभारल्या २० हून अधिक चौक्या !

यामागे चीनचा उद्देश येथील गस्त अधिक चांगली करून भारतावर लक्ष ठेवण्याचा आणि भारताला तत्परतेने प्रत्युत्तर देण्याचा असल्याचे म्हटले जात आहे.

बुर्ली-खोलेवडी येथे कृष्णा नदीवरील पूल केंद्रीय रस्ते फंडातून करावा ! – ग्रामस्थ आणि भारतीय किसान संघाची मागणी

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बुर्ली-खोलेवाडी दरम्यान कृष्णा नदीवर पूल व्हावा, अशी मागणी बर्‍याच वर्षांपासूनची तेथील ग्रामस्थांची आहे.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची अचानक शाळा पहाणी

सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा चालू आहेत का ?, याची अचानक पहाणी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली.

शिवसेना शाखा क्रमांक १ आणि पैलवान विशालसिंग राजपूत मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित किल्ला स्पर्धेचे पारितोषिक वितरण

कोरोनाची महामारी चालू असतांना त्या त्या भागात जाऊन किल्ला स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याविषयी शिवसेनेचे आयोजकIनी कौतुक केले.

हुल्लडबाज ट्रॅक्टर चालकांवर दंडात्मक कारवाई करा ! – शिवसेनेचे मुरुगुड पोलीस ठाण्यात निवेदन

प्रतिवर्षी होणार्‍या रस्त्यावरील अपघातांपेक्षा ट्रॅक्टरमुळे अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

कुतुब मीनार परिसरातील मशीद ही २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आल्याने ती हटवावी ! – देहली येथील न्यायालयात याचिका

जे सरकारने करायला हवे, त्यासाठी हिंदूंना न्यायालयात याचिका करून न्यायालयीन लढा द्यावा लागतो, हे अपेक्षित नाही !