तुर्कस्तानकडून सीरियातील १०० आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण !

भारताने तुर्कस्तानशी सर्व प्रकारचे राजनैतिक आणि व्यापारी संबंध तोडून त्याच्यावर बहिष्कारच घातला पाहिजे आणि काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकवर सैनिकी कारवाई केली पाहिजे !

नवी देहली – काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करण्यासाठी तुर्कस्तान आणि पाकिस्तान सीरियातील १०० आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. ‘काश्मीरमध्ये भारतीय सैन्याशी कसे लढावे’ याचे यात विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे आतंकवादी आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील युद्धात अझरबैजानकडून लढण्यासाठी तुर्कस्तानकडून पाठवण्यात आले होते.

 (सौजन्य : Punjab Kesari TV)

तुर्कस्तानने प्रत्येक आतंकवाद्याला ३ सहस्र डॉलर (२ लाख २१ सहस्र रुपये) देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यातील सर्वच रक्कम मिळालेली नाही, असा आरोपही या आतंकवाद्यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘हे पैसे मिळत नाही, तोपर्यंत काश्मीरमध्ये जाणार नाही’, असे या आतंकवाद्याच्या सुलतान मुराद ब्रिगेड या गटाने म्हटले आहे. तुर्कस्तानने मात्र अझरबैजान आणि अन्यत्र आतंकवाद्यांना पाठवण्याचे वृत्त फेटाळले आहे.