शिवसेना शाखा क्रमांक १ आणि पैलवान विशालसिंग राजपूत मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित किल्ला स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पारितोषिक वितरणाच्या प्रसंगी विशालसिंग राजपूत (डावीकडे – हातात सोन्याचे कडे असलेले) शेजारी श्री. संजय विभूते, तसेच अन्य

मिरज, १० डिसेंबर (वार्ता.) – सांगली मिडिया सर्व्हिसेस्, पैलवान विशालसिंग राजपूत मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १ यांच्या वतीने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच शिवसेना मिरज शहर जनसंपर्क कार्यालयात पार पडला. या वेळी जिल्हाप्रमुख श्री. संजय विभूते, मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. तानाजी सातपुते, मिरज शहरप्रमुख श्री. विशालसिंग राजपूत यांच्यासह अन्य पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक श्री. कुबेरसिंह राजपूत यांनी केले.

प्रथम क्रमांक बामनोळी येथील कु. शिवराज कदम बामनोळी याला देवगिरी किल्ला केल्याविषयी, द्वितीय क्रमांक मिरज येथील अजिंक्य रैद्रशंभो ग्रुप यांना नळदुर्ग किल्ला केल्याविषयी, तर तृतीय क्रमांक सांगली येथील दत्तनगर विकास मंडळ यांना कोंढाणा किल्ला केल्याविषयी आणि बामनोळी येथील कु. विजय शिंदकर यांना खांदेरी-उंदेरी किल्ला येथील किल्ला केल्याविषयी देण्यात आला. किल्ले बनवणार्‍यांना शिवसेनेच्या वतीने प्रमाणपत्रही देण्यात आले.

कोरोनाची महामारी चालू असतांना त्या त्या भागात जाऊन किल्ला स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याविषयी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय विभूते यांनी आयोजक श्री. कुबेरसिंह राजपूत आणि त्यांचे सहकारी यांचे कौतुक केले.