(म्हणे) ‘हनुमानाचा जन्मदिनांक ठाऊक असेल, तरच जयंती साजरी करा, नाहीतर केवळ कोंबडी खा ! ’

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे श्री हनुमानाविषयी आक्षेपार्ह विधान

निवडणुकीत समर्थन मिळण्यासाठी पीडीपीच्या नेत्याने हिजबूल मुजाहिदीनला दिले होते १० लाख रुपये !

पीडपीच्या नेत्यांचे आतंकवादी संघटनांशी असलेला संबंध पहाता अशा पक्षावर केंद्र सरकारने बंदीच घातली पाहिजे ! याविषयी पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती तोंड का उघडत नाहीत ?

केंद्र सरकारची ३ कृषी कायदे केरळमध्ये लागू न करण्याचा ठराव विधानसभेत संमत

मतदानाला भाजपचा एकमेव आमदार अनुपस्थित : ठरावाला पाठिंबा

संभाजीनगर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या धर्मांध मेहबूब शेखच्या प्रतिमेचे जळगाव येथे दहन !

येथील धर्मांध मेहबूब शेख याने खासगी शिकवणीवर्ग घेणार्‍या एका तरुणीवर नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली असून जळगाव येथील टॉवर चौकात भारतीय जनता युवा मोर्चा, भाजप महिला आघाडीच्या वतीने शेख याच्या प्रतिमेस चप्पल मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले.

पाकच्या सिंधमध्ये पोलीस अधिकार्‍याच्या खोलीमध्ये दोघा हिंदूंची हत्या !

केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंवर अत्याचार होतात, हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या रक्षणार्थ धोरणात्मक पावले न उचलल्याचे फलित ! या हत्यांविषयी जगातील एकही मानवाधिकार संघटना बोलत नाही, हे लक्षात घ्या !

निधन वार्ता

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील सनातनच्या साधिका सौ. अलका मुकेश सुलाखे यांच्या सासूबाई श्रीमती प्रभावती सुलाखे (वय ८४ वर्षे) यांचे ३० डिसेंबरच्या रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

पाकिस्तान चीनकडून खरेदी करणार कोरोनावरील लसीचे १२ लाख डोस !

चीननिर्मित कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश असल्याची ओरड भारतातील मुसलमान संघटनांनी केली आहे; मग ‘पाकला चीनची ही लस कशी काय चालते ?’, भारतीय मुसलमान संघटना पाकला याविषयी प्रश्‍न विचारतील का ?

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सव रहित

माण तालुक्यातील श्रीराम भक्तांचे श्रद्धास्थान ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक येथील पुण्यतिथी महोत्सव कोरोनामुळे रहित करण्यात आला आहे.

झारखंड पोलिसांच्या ट्विटर खात्यावर पोलिसांच्याच विरोधात अधिक तक्रारी !

जनतेला गुन्हेगारांपेक्षा पोलीस अधिक त्रासदायक वाटतात, हे यातून लक्षात येते ! केवळ झारखंड राज्यात अशी स्थिती आहे, तर देशातील अन्य राज्यांतही अशीच स्थिती असणारच, यात शंका नाही !

शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजे स्मारक स्वच्छता आणि अभिवादन मोहीम 

शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने १ जानेवारी या दिवशी रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.