पाकमधील १ सहस्र २०० वर्षांपूर्वीचे हिंदु मंदिर अतिक्रमणमुक्त !

भारतामध्ये कधी चर्च अथवा मशिदी यांच्यावर हिंदूंनी अवैध ताबा मिळवल्याचा स्वप्नात तरी कुणी विचार करील का ?

काँग्रेसची महागाईच्या प्रश्‍नावरून देशभरात निदर्शने

राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांच्यासह अनेक खासदार कह्यात

‘सनबर्न महोत्सव’ यंदा ३ ऐवजी ४ दिवस ! – रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

‘ईडीएम’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. ‘ईडीएम’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे !

(म्हणे) ‘भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात संघ ब्रिटिशांच्या बाजूने राहिला !’

तत्कालीन काँग्रेसचे धोरण पहाता सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, यांसारखे काही नेते वगळता नेहरू आणि त्यांचे पाठीराखे काँग्रेसवाले ब्रिटिशांचे हस्तक असल्यासारखेच वागत होते. रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची ‘राष्ट्राभिमानी’ हीच ओळख आहे.

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) – अपकीर्ती करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी खानोली येथील युवकावर गुन्हा नोंद

समाजाला धर्मशिक्षण न दिल्याने नीतीमत्ता अधोगतीला गेल्याचे उदाहरण !

सर्व पायाभूत सुविधा असतांना काही विषयांत गोव्यातील विद्यार्थ्यांची गुणांची सरासरी अल्प का ?

विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याची काळजी आम्हाला आहे. अल्प शिक्षक असलेल्या शाळांचीही आम्हाला चिंता आहे. शाळांनी सहकाराचे तत्त्व अंगीकारावे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून एकमेकांशी स्पर्धा करू नये.

गोव्यातील १२ तालुक्यांत स्वयंपूर्ण श्री गणेशचतुर्थी बाजार भरणार

या बाजारांत स्थानिक लोकांना श्री गणेशचतुर्थीच्या साहित्याची विक्री करण्यासाठी विनामूल्य कक्ष (स्टॉल) देण्यात येणार आहे. चतुर्थी बाजारामध्ये गोव्यातील पारंपरिक गोष्टींचे प्रदर्शन भरवले जाते. ज्यामुळे गोव्यातील कलेला प्रोत्साहन मिळते.

मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाची मेफेड्रॉनची निर्मिती करणार्‍या टोळीवर कारवाई !

१ सहस्र ४०३ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ७०० किलोहून अधिक मेफेड्रॉन जप्त !

उमेश कोल्हे हत्याप्रकरणी एन्.आय.ए.कडून आणखी २ आरोपींना अटक !

मुर्शिद अहमद अब्दुल रशीद (वय ४१ वर्षे) आणि अब्दुल अरबाज अ. सलीम (वय २३ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता ९ झाली आहे.

विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा हिंदु संघटनांच्या बैठकीत एकमुखी निर्णय !

नुकतीच शासकीय विश्रामधाम येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची ‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे एकत्रीकरण’ आणि ‘विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमण’ या दोन विषयांच्या संदर्भात चर्चा झाली. या बैठकीत विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.