रिझर्व्ह बँकेकडून रूपी सहकारी बँकेचा परवाना रहित !

बँकेच्या विलीनीकरणाचे प्रयत्नही चालू होते; मात्र विलीनीकरणाची चर्चा चालू असतांनाच रिझर्व्ह बँकेने रूपी बँकेचा परवाना रहित केला. यामुळे ठेवीदारांना धक्का बसला आहे.

भीमा नदीकाठच्या गावांनी दक्षता बाळगावी !

उजनी आणि वीर धरण यांतून पाण्याचा भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे. भीमा नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने नीरा आणि भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ !

कोयना-वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतीपर्जन्यवृष्टी होत असल्याने १२ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून धरणातून १० सहस्र १०० घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू आहे. धरणांमधील विसर्गामुळे आणि मुक्त पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी अंदाजे ३५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

संभाजीनगर येथे कार्यक्रमात विलंबाने आल्यामुळे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत यांच्यावर खासदार आणि आमदार यांची टीका !

लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहून जनतेसमोर आदर्श ठेवणे अपेक्षित आहे.

खड्डे बुजवण्यासाठी महापालिका केमिकल काँक्रीटचा उपयोग करणार !

महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी केमिकल काँक्रेटचा उपयोग चालू केला असून त्यामुळे अल्प वेळात आणि अल्प खर्चात खड्डे बुजवणे शक्य झाले आहे. अल्प वेळात खड्डा बुजवला जात असल्याने वाहतुकीला होणारा अडथळा ही अल्प होणार आहे, असा दावा महापालिकेने केला.

दहावा आरोपी शेख अकील शेख छोटू याला अटक !

उमेश कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांवर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती.

संभाजीनगर येथे ‘ईडी’विरुद्ध उद्धव ठाकरे गटाने लावलेले फलक काढले !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे जय विश्वभारती कॉलनी शाखाप्रमुख रोहन आचलिया यांनी रोपळेकर, विवेकानंद चौक येथे ‘ईडी’ कारवाईविषयी फलक लावले.

सलग सुट्यांमुळे मुंबई बाहेर जाणार्‍या वाहनांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी !

सलग सुट्ट्या आल्यावर वाहतूक कोंडी होते, हे लक्षात घेऊन अत्यावश्यक वाहनांना लवकर जाण्यासाठी मार्ग ठेवणे आवश्यक !

हेदपाडा (जिल्हा नाशिक) येथे गर्भवती महिलेचा झोळीतून चिखलवाटेतून ३ कि.मी.चा प्रवास !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मूलभूत सुविधांची वानवा !

मुंब्रा येथे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या २ धर्मांधांना अटक 

पोलिसांनी सापळा रचून इरफान सय्यद आणि रज्जाक रंगरेज यांना कह्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून ७२ ग्रॅम वजनाचा एम्.डी. हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.