श्रीलंकेच्या नौदलाकडून २५ भारतीय मासेमार्‍यांना अटक !

श्रीलंकेकडून सातत्याने भारतीय मासेमार्‍यांना अटक केली जात असतांना भारत सरकारने आतापर्यंत अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते ! असे का होत नाही ?, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित होतो !

Cyclone Michaung: चेन्नई शहराला ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा मोठा फटका : जनजीवन विस्कळीत

बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ या  चक्रीवादळामुळे पालटलेल्या हवामानाचा तमिळनाडूची राजधानी चेन्नईसह काही जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तमिळनाडूमध्ये मिचाँग चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस

चेन्नई शहरामध्ये अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती
विमानतळावरील विमान वाहतूक बंद  

Corrupt ED : तमिळनाडूमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍याला २० लाख रुपयांची लाच घेतांना अटक

अंकित याने या डॉक्टरला धमकावून कार्यालयात बोलावले होते. त्याच्याकडे कारवाई करण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती.

देवाने प्रार्थना पूर्ण न केल्याने मंदिरात पेट्रोल बाँब फेकणार्‍याला अटक !

चेन्नई येथील कोट्टावलचावडी भागातील वीरभद्र मंदिरात पेट्रोल बाँब टाकल्याच्या प्रकरणी मुरलीकृष्णन् या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. ‘माझी प्रकृती ठीक नाही. प्रकृती बरी व्हावी, यासाठी मी प्रतिदिन देवाची प्रार्थना करत होतो; पण देवाने माझी मनोकामना पूर्ण केली नाही.

चेन्‍नई (तमिळनाडू) येथे ‘श्री टीव्‍ही’ या हिंदुत्‍वनिष्‍ठ यूट्यूब वाहिनीचा ८ वा स्‍थापनादिन साजरा !

येथील ‘श्री टीव्‍ही’ या हिंदुत्‍वनिष्‍ठ यूट्यूब वाहिनीने ८ व्‍या वर्षात यशस्‍वी पदार्पण केले आहे. त्‍या निमित्ताने चेन्‍नईमधील श्री गुरु बालाजी कल्‍याण मंडपम् येथे ‘श्री टीव्‍ही’चा ८ वा स्‍थापनादिन साजरा करण्‍यात आला.

चेन्‍नई (तमिळनाडू) येथे ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’ने आयोजित केलेली ‘सनातन हिंदु धर्मजागृती सभा’ पार पडली !

येथील एम्.जी.आर्. नगरमधील सेल्‍वा महालमध्‍ये ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’च्‍या (हिंदु जनता पक्षाच्‍या) वतीने आयोजित करण्‍यात आलेली ‘सनातन हिंदु धर्मजागृती सभा’ उत्‍साहपूर्ण वातावरणात पार पडली.

चेन्नईमध्ये ‘वाईफ स्वॅपिंग’ पार्टीच्या नावाखाली चालणारा वेश्याव्यवसाय पोलिसांनी बंद पाडला !  

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय किती खालच्या स्तरावर जात आहेत, हेच यातून लक्षात येते ! समाजाची नैतिकता प्रतिदिन अधिकाधिक रसातळाला जात आहे. ही स्थिती समाजाच्या विनाशाला कारणीभूत ठरली, तर आश्‍चर्य वाटू नये !

HR & CE ministry BJP Tamilnadu : तामिळनाडूत निवडून आल्यास हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी मंत्रालय बंद करू ! – भाजप

राज्यातील भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी भाजप सत्तेत आल्यास काय करेल?, यावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. श्रीरंगम् येथील फेरीच्या वेळी त्यांनी घोषणा केली की, आम्ही सत्तेत येताच ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी मंत्रालय’ रहित करू.

निबंध लिहितांना उत्स्फूर्तपणे भावनिक होणे आणि देशभक्ती अनुभवणे स्वाभाविक असू शकते ! – मद्रास उच्च न्यायालय

महिला उमेदवाराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा !
निबंधाच्या शेवटी ‘जय हिंद’ लिहिल्याने तमिळनाडू लोकसेवा आयोगाने अवैध ठरवली होती उत्तरपत्रिका !