कारई (कांचीपूरम्, तमिळनाडू) येथील ग्रामदैवत श्री पुळियत्तम्मन्देवीच्या मंदिरात पार पडला कुंभाभिषेक !

कुंभाभिषेकाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती !

कांचीपूरम् (तमिळनाडू) – कांचीपूरम् जिल्ह्यातील कारई गावाचे ग्रामदैवत श्री पुळियत्तम्मन्देवीच्या मंदिरात १० जुलै या दिवशी कुंभाभिषेक पार पडला. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. हा कुंभाभिषेक पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत पार पडला. या उत्सवाच्या वेळी कारई गावाचे ग्रामसेवक श्री. कुमार, भाजपचे कारई गावाचे अध्यक्ष श्री. भूपती आणि कारई प्रभागाचे नगरसेवक श्री. मूर्ती हेही उपस्थित होते. या कुंभाभिषेकाच्या वेळी गावातील शेकडो देवीभक्त उपस्थित होते. या कुंभाभिषेकाच्या नंतर पूजा करण्यात आलेल्या कलशातील तीर्थ सर्व भक्तांवर शिंपडण्यात आले. यानंतर सर्व देवीभक्तांनी देवीचे दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला.

श्रीपुळियत्तम्मन्देवीच्या नावाचा अर्थ आणि अन्य माहिती

तमिळ भाषेत पुळि म्हणजे चिंच आणि अम्मन् म्हणजे देवी ! थोडक्यात सांगायचे, तर चिंचेच्या वृक्षाखाली निवास करणारी देवी म्हणजे श्री पुळियत्तम्मन् ! या मंदिराच्या बाजूला सुंदर असा एक चिंचेचा वृक्ष आहे. हा वृक्ष पुष्कळ प्राचीन असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा आहे. तमिळनाडू राज्यात प्रत्येक १२ वर्षांनी प्रत्येक मंदिरातून कुंभाभिषेक करण्यात येतो.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देवीला पंचफळ आणि ओटी अर्पण करून देवीचे दर्शन घेतले, तसेच ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यासाठी श्री पुळियत्तम्मन्देवीला प्रार्थना केली. यानंतर मंदिराच्या विश्वस्तांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा शाल भेट देऊन सन्मान केला. श्री पुळियत्तम्मन्देवी मंदिराच्या विश्वस्तांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना मे २०२४ मध्ये भेटून कुंभाभिषेकाचे निमंत्रण दिले होते.

श्री पुळियत्तम्मन्देवी