Anti-Sanatan DMK : विद्यार्थ्यांना अंगठी घालण्यावर आणि कपाळावर गंध लावण्यावर बंदी येणार !

  • तमिळनाडूत विद्यार्थ्यांशी संबंधित तुघलकी अहवाल द्रमुक सरकारकडे सुपुर्द !

  • भाजपचा विरोध !

( द्रमुक (द्रविड मुन्‍नेत्र कळघम्) म्‍हणजे द्रविड प्रगती संघ)

न्यायमूर्ती के चंद्रू समितीने मंगळवारी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना आपला अहवाल सादर केला.

चेन्नई (तमिळनाडू) – शाळांमधून कथित जातीयवाद हटवण्यासाठी तमिळनाडूतील द्रमुक सरकारसमोर एक तुघलकी अहवाल सादर करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात मनगटावर बँड बांधण्यास, बोटात अंगठी घालण्यास, तसेच कपाळावर गंध लावण्यास बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. सरकारचा हिंदुद्वेष पहाता ही शिफारस मान्य करून या गोष्टींवर बंदी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वर्ष २०२३ मध्ये राज्यातील तिरुनेलवेली येथे दलित भाऊ आणि त्याची बहीण यांना उच्च जातीतील काही विद्यार्थ्यांनी कथितरित्या मारहाण केली होती. हे कारण पुढे करून सरकारने मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. चंदू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने नुकताच तिचा अहवाल मुख्यमंत्री स्टॅलिन यांना सादर केला.

भाजपने या अहवालाला विरोध केला आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष एच्. राजा यांनी या शिफारसी हिंदुविरोधी असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे कल्लर जातीच्या हिंदूंनीही जातीय पदवी हटवण्याच्या शिफारसीवर आक्षेप नोंदवला आहे, तसेच शिक्षकांनी स्थानांतराच्या सूत्राला विरोध केला आहे.


विद्यार्थ्यांशी संबंधित तुघलकी अहवाल –


६१० पानांच्‍या या अहवालातील या आहेत महत्त्वपूर्ण शिफारशी !

१. शाळेतील नावांतून जातीवाचक शब्‍द हटवावेत.

२. शिक्षकांना वेळोवेळी स्‍थानांतरित करावे.

३. हजेरी पत्रकात विद्यार्थ्‍यांची जात लिहिली जाऊ नये.

४. प्रशासकीय आघाडीवर मुख्य शिक्षण अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, गटशिक्षण अधिकारी आणि उच्च अन् उच्च माध्यमिक विद्यालयातील अध्यापकांची त्यांच्या जातीतील लोक मोठ्या प्रमाणात असलेल्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येऊ नये.

(सौजन्य : Times Now)

संपादकीय भूमिका

  • ‘सनातन’ला नष्ट करण्याची भाषा करणार्‍या द्रमुक सरकारच्या राजवटीत यापेक्षा वेगळे काय घडणार ? हिंदूंच्या मुळावर उठलेल्या अशा रझाकारी सत्ताधार्‍यांना हिंदूसंघटन करून पुढील निवडणुकीत कायमचे घरी बसवले पाहिजे !
  • मुसलमान विद्यार्थिनींच्या हिजाबवर (मुसलमान महिला डोके आणि मान झाकण्यासाठी वापरत असलेल्या वस्त्रावर) बंदी आणण्याच्या कर्नाटकातील शाळांच्या नियमाला विरोध करणारे पुरो(अधो)गामी आता चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !