तमिळनाडूत विषारी दारू प्यायलाच्या प्रकरणातील मृतांची संख्या ४७ वर !

तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णाची भेट घेतली

चेन्नई (तमिळनाडू) – कल्लाकुरीची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या ४७ वर पोचली आहे. यासह ३० हून अधिक लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेच्या निषेधार्थ अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी तामिळनाडू विधानसभेच्या आत आणि बाहेर निदर्शने केली.

निदर्शनांच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली  होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे. दुसरीकडे तमिळनाडू सरकारच्या वतीने सांगण्यात आले की, या प्रकरणी पोलिसांनी ४९ वर्षीय गोविंदराज उपाख्य कन्नूकुट्टी याला अटक केली आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अनुमाने २०० लिटर अवैध दारूच्या तपासणीत त्यात घातक ‘मिथेन’ असल्याचे उघड झाले. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

संपादकीय भूमिका

  • जोपर्यंत सरकार दारूकडे ‘महसूली उत्पन्नाचे साधन’ म्हणून बघत राहील, तोपर्यंत अशा घटना घडतच रहातील ! जनतेने सरकारला दारूबंदी करण्यास भाग पाडले पाहिजे !