माझ्या वडिलांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा ! – ओमराजे निंबाळकर, ठाकरे गट

पवनराजे हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि दोन महिन्यांत निकाल लावावा. सर्व सत्य समोर आणावे, अशी मागणी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

वाघोली (पुणे) येथे अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार !

छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुलींची होणारी फसवणूक लज्जास्पद !

बारामती सहकारी बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा गायब !

मुळशी येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये यंदा ‘धनशक्ती’चा वापर होत असल्याचा आरोप केला होता.

जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांतील चित्रे आणि कलाकृती पाहून दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ भारावून गेले !

अभिनेता गगन मलिक यांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांना १ मे या दिवशी भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ आणि थायलंडचे कलाकारही होते.

 बार्सेवाडा (गडचिरोली) येथील ३ जणांना जादूटोण्याच्या संशयावरून जिवंत जाळले !

१ मे या दिवशी एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून एका महिलेसह २ जणांना काही गावकर्‍यांनी मिळून जिवंत जाळले.

अमरावती येथील ३ उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांसह ९ जणांना अटक !

उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी चोरीचे कृत्य करणे, हे लज्जास्पद आहे. अशा अधिकार्‍यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !

गेल्या २ वर्षांपासून आमचे रेशन बंद का ? तेवढेच सांगा !

८० कोटी लोकांना केंद्र सरकारने धान्यवाटप केल्याच्या गप्पा नका सांगू. आमचे धान्य का बंद आहे ? त्याचे उत्तर द्या. याविषयी सरकार दरबारी प्रश्न मांडा’, असा जाब महायुतीचे जालना येथील उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लाभार्थींनी विचारला.

गांजा विक्री प्रकरणात अटक केलेली महिला लोणीकंद (पुणे) पोलीस ठाण्यातून पसार !

पोलीस ठाण्यातून गुन्हेगार पसार होत असेल, तर पोलीस नेमके करतात तरी काय ? असा प्रश्न निर्माण होतो !

उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर सर्व सुविधा द्या !

तीव्र उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मतदानासाठी मतदान केंद्रावर येणारे मतदार आणि नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक त्या सेवासुविधा द्या. जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा.

सेवा निवृत्तीच्या दिवशीच कर्मचार्‍यांना त्यांचे सर्व देय लाभ मिळणार ! – कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई

सेवा निवृत्तीच्या दिवशीच कर्मचार्‍यांना त्यांचे देय असलेले सर्व लाभ देण्यात येतील, असे आश्वासन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी दिले. पालिका मुख्यालयात आयोजित कर्मचारी सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमात बोलत होते.