पुणे – गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेली छकुली सुकळे ही महिला लोणीकंद पोलीस ठाण्यातून पसार झाल्याचे उघडकीस आले. वाघोली परिसरात गायरान वस्तीत सुकळे ही महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती २५ एप्रिल या दिवशी लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. त्यात तिच्याकडून १ किलो ३२९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. मध्यरात्री कारवाई केल्याने पोलिसांनी तिला केवळ नोटीस बजावली. दुसर्या दिवशी सकाळी तिला अटक करण्यात आली. लोणीकंद पोलीस ठाण्यात तिला नेण्यात आल्यावर पोलीस शिपाई तळेकर यांनी तिच्यावर लक्ष ठेवले होते. अटकेची कारवाई केल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करत असतांना सुकळे पोलिसांचे लक्ष चुकवून पोलीस ठाण्यातून पसार झाली. (पोलीस ठाण्यातून आरोपीचे पलायन होणे यातून पोलिसांची अकार्यक्षमता लक्षात येते ! – संपादक)
संपादकीय भूमिकापोलीस ठाण्यातून गुन्हेगार पसार होत असेल, तर पोलीस नेमके करतात तरी काय ? असा प्रश्न निर्माण होतो ! |