जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांतील चित्रे आणि कलाकृती पाहून दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ भारावून गेले !

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी

छत्रपती संभाजीनगर – अभिनेता गगन मलिक यांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांना १ मे या दिवशी भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ आणि थायलंडचे कलाकारही होते. लेण्यांतील चित्र आणि कलाकृती पाहून ते भारावून गेले होते. जगातील उत्कृष्ट लेणी आणि सहस्रों वर्षांचे कोरीव काम पाहून पाहुण्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

या वेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक डॉ. तुषार तीनगोटे आणि दक्षिण कोरियाचे शांतता दूत योंग जो मून, कोरिया महिला आस्थापन संघटनेच्या अध्यक्षा बान ही किम, थायलंड येथील प्रसिद्ध अभिनेत्री प्लोनिसा वोरॅपिसिटकून वालुकामय उपस्थित होते. या वेळी त्यांचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी विविध माहितगारांनी त्यांना लेण्यांची माहिती दिली.