वरुथिनी एकादशीला दर्शन घेणार्‍या वारकर्‍यांना दर्शन रांगेत कडक उन्हातून दर्शन घेण्याची वेळ !

पंढरपूर – पंढरपूर येथे सध्या प्रचंड उन्हाळा असून तापमान ४३ अंश सेल्सिअस इतके आहे. असे असतांना पांडुरंगच्या दर्शनासाठी येणार्‍या वारकर्‍यांची परवड मात्र थांबलेली नाही. ४ मे या दिवशी झालेल्या वरुथिनी एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग होती. या रांगेतून जातांना सारडा भवन, तसेच इतर अनेक ठिकाणी उन्हापासून संरक्षण होण्यासाठी कशाचीच सोय नव्हती. त्यामुळे वारकर्‍यांना … Read more

परभणी येथे मुलीने आतंरजातीय विवाह करू नये, यासाठी पालकांकडून मुलीची हत्या

जिल्ह्यातील पालम तालुक्यामधील नाव्हा या गावातील एका १९ वर्षीय मुलीने तिच्या आंतरजातीय प्रियकराशी प्रेमविवाह करण्याचा निश्‍चय केला; मात्र या प्रेमविवाहाला पालकांचा विरोध होता.

मुलाचे निधन झाल्यामुळे मी धार्मिक मूर्ती घराबाहेर फेकून घरातील देवघर बंद केले ! – अभिनेते शेखर सुमन

अध्यात्मशास्त्रानुसार जन्म, मृत्यू या घटना व्यक्तीच्या प्रारब्धानुसार घडत असून  गुरुही त्यात हस्तक्षेप करत नाहीत. त्यामुळे अशा घटनांमुळे देवावरचा विश्‍वास उडून देवाला दोष देणे कितपत योग्य ?

Afghan Diplomat Arrested: सोन्याच्या तस्करी प्रकरणी अफगाणिस्तानच्या राजनैतिक महिला अधिकार्‍याला मुंबईत पकडले !

भारत दौर्‍यावर असलेल्या अफगाणिस्तानच्या राजनैतिक महिला अधिकारी झाकिया वर्दाक २५ किलो सोन्याची तस्करी करतांना २५ एप्रिल या दिवशी मुंबई विमानतळावर पकडण्यात आले.

Boycott Loksabha Elections 2024 : असनिये (सिंधुदुर्ग) गावातही राजकीय प्रचाराला बंदी !

जनतेला असा निर्णय घ्यावा लागणे, हे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

Loksabha Elections 2024 : मी अद्याप हिंदुत्व सोडलेले नाही ! – उद्धव ठाकरे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ‘इंडि’ आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे (ठाकरे गट) विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी असे वक्तव्य केले.

दीड महिन्यात महाराष्ट्रात २२० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

भारतीय लोकशाहीला काळीमा फासणार्‍या संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !

हुपरीतील धार्मिक स्थळाला देण्यात आलेल्या अवैध नळजोडणीच्या संदर्भात योग्य ती कृती करा ! – साहाय्यक आयुक्त, कोल्हापूर

अवैध गोष्टीवर कारवाई करण्यासाठी नागरिकांना पत्रव्यवहार का करावा लागतो ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?

आचारसंहिता लागल्याने शिवरायांची वाघनखे आणण्यास विलंब ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री

वाघनखे आणण्याविषयी आम्ही ४ मे हा दिनांक निश्चित केला होता. त्या दृष्टीने सर्व पत्रव्यवहार झाला. ४ मे या दिवशी येण्याविषयी लिखित मान्यता देण्यात आली; पण जेव्हा आचारसंहिता लागली, तेव्हा त्यांनी आमच्याशी चर्चा केली. 

भोर (पुणे) येथील १० गावांना ७ टँकरने पाणीपुरवठा चालू !

वर्ष २०२३ मध्ये पर्हर, उंबर्डे, शिळिंब, वारखंड, शिरगाव या ५ गावांना २ टँकरने पाणीपुरवठा केला होता. तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे.