
पुणे – वाघोली येथील अल्पवयीन मुलीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती गर्भवती राहिल्याची घटना समोर आली. मुलीवर अत्याचार होऊनही पीडितेच्या आईने अत्याचार करणार्याची साथ दिल्याने आईसह तिघांवर ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अविनाश शेळके, गोविंद काकडे आणि पीडितेची आई अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पीडितेने स्वत: वाघोली पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. (बलात्कार पीडितेची आईही दुष्कृत्यामध्ये सहभागी असणे, हे समाजाची नीतीमत्ता खालावल्याचे लक्षण ! – संपादक)
१. पीडिता एका कापड दुकानांमध्ये काम करत असतांना शेळके याने तिच्याशी मैत्री केली. त्याने लग्नाचे आमीष दाखवून ३ वेळा बळजोरीने शारीरिक संबंध निर्माण केले.
२. पीडितेची अश्लील छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन शेळके याने पुन्हा संबंध निर्माण केले.
३. काकडे हा पीडितेच्या आईचा मित्र आहे. त्याने घरात कुणीही नसतांना पीडितेच्या समवेत बळजोरीने शारीरिक संबंध ठेवले.
४. ही घटना पीडितेने आईला सांगितली. तेव्हा आईने तिलाच धमकी देत पोलिसांमध्ये तक्रार करू दिली नाही. पीडितेस या संबंधांतून त्रास होऊ लागल्याने तिची वैद्यकीय पडताळणी केली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.
संपादकीय भूमिका :छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुलींची होणारी फसवणूक लज्जास्पद ! |
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड
केरळम्मध्ये जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यातूनच चोरीला !
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
तुळजापूर मंदिरातील सशुल्क दर्शन पास बंद करण्यासाठी पुजारी मंडळाचे धरणे आंदोलन !