पैशांसह साड्यांची लाच मागणार्‍या सहकार अधिकार्‍यासह त्यांच्या मुलाला अटक

सोसायटीच्या दुरुस्तीसाठी ‘सिंकिंग फंड’ (दुरुस्ती निधी) वापरता यावा म्हणून दोन लाख रुपयांसह दोन साड्यांची लाच मागणारे सहकार अधिकारी भरत काकड आणि त्यांचा मुलगा सचिन काकड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रीय कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

यवतमाळ येथे टोळी विरोधी पथकाकडून ५ तलवारी बाळगणार्‍या धर्मांध युवकास अटक !

स्थानिक वसीम लेआऊट, भोसा रोड परिसरामध्ये अनधिकृतरीत्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये ५ लोखंडी धारधार तलवारी खांद्यावर घेऊन जाणार्‍या राहील शाहा (वय १९ वर्षे) या धर्मांध युवकास टोळी विरोधी पथकाने अटक केली.

मी हिंदु, धर्माचा प्रश्‍न येईल तेव्हा धर्माच्या बाजूने बोलेन !

मी कर्माने आणि धर्मानेही हिंदु आहे. हिंदुत्व हा माझ्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. मी हिंदु धर्माविषयी बोलू शकते; मात्र आतापर्यंत बोलण्याची आवश्यकता भासली नाही; मात्र जेव्हा धर्माचा प्रश्‍न येईल, तेव्हा हिंदु धर्माच्या बाजूने बोलेन, असे वक्तव्य अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले.

कोल्हापुरात पारपत्र कार्यालय आजपासून चालू

कोरोना संक्रमणामुळे एप्रिलपासून पारपत्र कार्यालय बंद होते.  जानेवारी ते मार्च या तीन मासांत ७ सहस्र पारपत्रांच्या कामांची पूर्तता झाली होती; मात्र दळणवळण बंदीमुळे पुढील प्रक्रिया बंद होती.

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची आमदार सुधीर गाडगीळ जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट !

सातारा येथील भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ३० नोव्हेंबर या दिवशी सांगली येथील भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे मानसिक आरोग्य पडताळण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचा शासनाचा आदेश

राज्यातील प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाची मानसिक पडताळणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यासाठी आधुनिक वैद्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही पडताळणी कशा प्रकारे करावी, याविषयीचा अहवाल या समितीने नुकताच शासनाकडे सादर केला आहे.

भारतीय संस्कृती जगाला विश्‍वशांतीचा मार्ग दाखवील ! – इंद्रेश कुमार, अध्यक्ष, मुस्लिम राष्ट्रीय मंच

भारतीय संस्कृती देशाला विश्‍व गुरू बनवून जगाला विश्‍वशांतीचा मार्ग दाखवील= मुस्लिम राष्ट्र्रीय मंचाचे अध्यक्ष इंद्रेश कुमार.

कोल्हापूरच्या गिर्यारोहकांचे लिंगाणा सुळक्यावर यशस्वी आरोहण !

३ सहस्र १०० फूट उंचीच्या शिवलिंगाच्या आकाराचा अतीदुर्गम असा कातळकडा म्हणजेच गिरीदुर्ग लिंगाणा कोल्हापूरच्या गिर्यारोहकांनी यशस्वीरित्या सर केला.

‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे शरिरावर गंभीर परिणाम झाल्याने वितरण थांबवण्याची चेन्नईच्या स्वयंसेवकाची मागणी

एका ४० वर्षीय स्वयंसेवकाने कोव्हिशिल्ड लसीच्या चाचण्या, उत्पादन आणि वितरण तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.