काशी विश्‍वनाथ मंदिराच्या २ कि.मी. परिसरात मांस आणि मद्य यांच्या विक्रीवर बंदी

५५ दुकानांना नोटीस, तर १० दुकानांवर गुन्हा नोंद

काशी विश्‍वनाथ मंदिर

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्‍वनाथ मंदिराच्या २ कि.मी. परिघात मांस आणि दारू यांची दुकाने बंद करण्याच्या निर्णयाची कार्यवाही केली जात आहे. या संदर्भात मंदिर संकुलाच्या २ कि.मी. परिघात असलेल्या ५५ दुकानांना नोटीस बजावण्यात आली आहे. सध्या विविध नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली यांपैकी १० दुकानांवर ३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी वाराणसी महानगरपालिकेने काशी विश्‍वनाथ मंदिराच्या २ कि.मी.च्या परिघात असलेली सर्व मांस आणि दारू यांची दुकाने हटवण्याचा निर्णय घेतला होता.

महापौर आलोक तिवारी यांनी सांगितले आहे की, ही दुकाने दुसर्‍या ठिकाणी हलवण्याबाबत दुकानदारांसमवेच्या बैठकीत एकमत होण्याची अपेक्षा आहे. आम्ही कुणाचाही उदरनिर्वाह थांबवू इच्छित नाही.

संपादकीय भूमिका

देशातील सर्वच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी असा निर्णय घेणे आवश्यक आहे !