
चेन्नई (तमिळनाडू) – सनातन संस्था निर्मित ‘सनातन तमिळ अँड्रॉईड पंचांग २०२५’चे चेन्नई येथील प्रख्यात कर्नाटक गायिका आणि हरिकथा सांगणार्या सौ. विशाखा हरि यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. सुगंधी जयकुमार या उपस्थित होत्या. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
या वेळी सौ. सुगंधी जयकुमार यांनी सौ. विशाखा हरि यांना सनातन संस्थेचे आश्रम आणि संस्थेकडून घेण्यात येणारे विविध उपक्रम यांच्याविषयीची माहिती सांगितली. ही सर्व माहिती ऐकून सौ. विशाखा हरि यांनी गोवा येथील सनातन आश्रमाला भेट देण्याची इच्छा प्रप्रदर्शित केली, तसेच सनातनचे तमिळ भाषेतील ग्रंथ पाहून त्या पुष्कळ प्रभावित झाल्या.
सौ. विशाखा हरि यांचा परिचयसौ. विशाखा हरि या शिक्षणातील प्रस्थापित कला आणि सर्जनशीलता यांना समर्पित असलेल्या त्या एक चांगल्या मार्गदर्शक आहेत. भारतीय परंपरेतील चांगली मूल्ये आणि धर्मविषयक ज्ञान पुढच्या पिढीसाठी देण्यास त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. त्या करत असलेल्या हरिकथा आणि कर्नाटक संगीत या क्षेत्रांतील कार्याविषयी त्यांना अनेक पदके, बक्षीसे अन् पुरस्कार प्राप्त झाले आहेत. |