मुंबई पोलीस भरतीच्या परीक्षेत गैरप्रकार !

नागपूर – मुंबई पोलीस भरतीत शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ११ आणि १२ जानेवारी या दिवशी घेण्यात आली. पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई चालक या तीन पदांसाठी परीक्षा झाली. यात एका ठिकाणी कॉपी करतांना एकाला पकडल्यानंतर वेगवेगळ्या केंद्रांवर ५ जणांना अटक करण्यात आली. कॉपीसाठी ‘इलेक्ट्रिक डिव्हाईस’ आणि ‘इअर बर्ड’ यांचा वापर करण्यात आला होता. बनावट हॉल तिकीटही या वेळी जप्त करण्यात आले. या प्रकरणी चालकपदासाठी आलेल्या एकाचा, तर शिपाईपदासाठी आलेल्या ४ उमेदवारांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

परीक्षेच्या वेळी गैरप्रकार करणारे पोलीस राज्यात कायदा-सुव्यवस्था आणण्यास कधीतरी पात्र ठरतील का ? अशांना वेळीच कठोर शिक्षा द्यायला हवी !