श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची आमदार सुधीर गाडगीळ जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट !

श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज भोसले (डावीकडून तिसरे) यांचे स्वागत करतांना भाजप आमदार सुधीर गाडगीळ (उजवीकडे) यांसह अन्य

सांगली, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – सातारा येथील भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ३० नोव्हेंबर या दिवशी सांगली येथील भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री. शेखर इनामदार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले, सांगली शहर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. स्वाती शिंदे, गटनेते श्री. युवराज बावडेकर, भाजप नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मिरवणूक काढून स्वागत !

श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज भोसले (मध्यभागी पांढरा सदरा घातलेले) यांचे स्वागत करतांना श्री. नितीन चौगुले (उजवीकडे) यांसह अन्य

तत्पूर्वी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भव्य मिरवणूक काढून श्री. नितीन चौगुले यांनी सांगलीत त्यांचे स्वागत केले. श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज भोसले यांनी श्री. नितीन चौगुले यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या वेळी औक्षण करून महाराजांचे स्वागत करण्यात आले. या वेळी श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी श्री. नितीन चौगुले यांच्या समवेत विविध विषयांवर चर्चा केली.

या वेळी श्री. नितीन चौगुले म्हणाले, श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या आशीर्वादामुळेच देव, देश, धर्म कार्य करण्याची प्रेरणा मिळाली., या प्रसंगी धारकरी सर्वश्री सुनीलबापू लाड, राजेंद्र शहापुरे, सचिन मोहिते, सचिन देसाई, प्रकाश निकम, प्रशांत गायकवाड, सतीश खांबे, भुषण गुरव, जयदीप चेंडके, पिंटू मोने, रवी नाईक (सावकार) यांसह अन्य उपस्थित होते.