
कोइम्बतूर (तमिळनाडू) – राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस) तिरुप्पूर आणि कोइम्बतूर जिल्ह्यांत अचानक टाकलेल्या धाडीत ३१ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. हे घुसखोर बर्याच काळापासून तिरुप्पूर आणि कोइम्बतूर जिल्ह्यांत रहात होते. हे लोक बंगालमार्गे भारतात घुसले होते आणि नंतर तिरुप्पूर आणि कोइम्बतूर या जिल्ह्यांतील ग्रामीण भागांत बनावट कागदपत्रे बनवून रहात होते, हे चौकशीत उघड झाले आहे. अटक केलेल्या या घुसखोरांना पल्लादम आणि तिरुप्पूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
१. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच विधान केले होते की, अनेक बांगलादेशी घुसखोर येथे लपले आहेत आणि तमिळनाडू पोलिसांनी त्यांची चौकशी करावी. त्यानंतर तमिळनाडू पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी घुसखोरांच्या विरोधात कारवाई चालू केली; तर मग तमिळनाडू सरकार काय करते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यास त्यात चुकीचे के काय ? – संपादक)
२. ११ जानेवारी या दिवशी त्रिपुरा राज्यातील खोवई जिल्ह्यात सीमा सुरक्षादलाच्या सैनिकांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असतांना ३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली.