कोल्हापुरात पारपत्र कार्यालय आजपासून चालू

कोल्हापूर – कोरोना संक्रमणामुळे एप्रिलपासून पारपत्र कार्यालय बंद होते.  जानेवारी ते मार्च या तीन मासांत ७ सहस्र पारपत्रांच्या कामांची पूर्तता झाली होती; मात्र दळणवळण बंदीमुळे पुढील प्रक्रिया बंद होती. कोल्हापुरातील ज्यांना उपचार, शिक्षण किंवा अन्य कारणासांठी तातडीने परदेशात जावे लागणार होते, त्यांना पुण्यातील कार्यालयात पारपत्र काढण्यासाठी जावे लागत होते. दळवळण बंदी शिथिल झाल्यानंतर हे कार्यालय चालू करण्याची मागणी जोर धरू लागली त्यामुळे १ डिसेंबरपासून हे कार्यालय चालू होत आहे.

हे कार्यालय रमणमळा येथे चालू होत आहे. प्रतिदिन ५० मुलाखती होणार आहेत. मुलाखतीला येण्यापूर्वी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे, तसेच कार्यालयात मास्क, सॅनिटायझरचा वापरही करावा लागणार आहे.