
उरण – तालुक्यातील चिरनेर गावातील कोंबड्या अचानक आजारी पडून त्या मृत्यू पावत आहेत. अनेक शेतकर्यांच्या कोंबड्या मोठ्या संख्येने मरत असल्याने त्यांची सहस्रो रुपयांची हानी होत आहे.
कोंबड्यांच्या संदर्भातील साथीच्या आजारांवर पशूसंवर्धन विभागाकडून योग्य उपचार होत नाहीत. पशूवैद्यकीय अधिकार्यांनी योग्य उपचार केले असते, तर अशी हानी झाली नसती, असे काही कुक्कुटपालक शेतकर्यांचे म्हणणे आहे. पशूपालन विभागाच्या आधुनिक वैद्यांना याची कल्पना देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
संपादकीय भूमिकापशूसंवर्धन विभागाला याविषयी काय म्हणायचे आहे ? |