विवाह कार्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पोलीस यांची अनुमती बंधनकारक ! – प्रशासनाचा निर्णय

येत्या जानेवारी, फेब्रुवारी मध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पालिका आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. विवाह कार्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पोलीस यांची अनुमती बंधनकारक करण्यात आली आहे.

नाशिक येथील नगरसेवक भगवान कटारिया यांच्यावर धर्मांधाकडून आक्रमण

नगरसेवक भगवान कटारिया यांच्यावर अस्लम सईद सैय्यद या संशयितIने आक्रमण करत त्यांना शिवीगाळ केली.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने किल्ले स्पर्धेचे आयोजन

मुलांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने गड-किल्ले स्पर्धेचे यंदाही आयोजन.

ठाणे येथील प्रख्यात मामलेदार मिसळ उपाहारगृहाचे मालक लक्ष्मण मुर्डेश्‍वर यांचे निधन

येथील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मण मुर्डेश्‍वर (वय ८४ वर्षे) यांचे १ डिसेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्यावर ठाणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू होते. लक्ष्मण मुर्डेश्‍वर हे सनातन संस्थेचे हितचिंतक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक होते.

पुणे जिल्ह्यात सर्वांत अल्प, तर कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी मतदान

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबर या दिवशी मतदान झाले. यात पदवीधरसाठी ५७.९६ टक्के आणि शिक्षक मतदारसंघासाठी ७३.०४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदार पुणे येथे असूनही नेहमीप्रमाणे तेथील सुशिक्षितांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी मात्र निरुत्साह दिसून आला.

मुंबई येथे अमली पदार्थांची विक्री करणार्‍या धर्मांध महिलेला अटक

अमली पदार्थांची विक्री करणार्‍या शाबिना खान या महिलेला १ डिसेंबर या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली.

बांदा तपासणी नाक्यावर पावणे चार लाख रुपयांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात

गोव्याहून नियमितपणे महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक होत असते ! पोलीस त्या वेळी थातुर-मातुर कारवाई करतात आणि सोडून देतात. त्यामुळे वर्षानुवर्षे कारवाई करूनही वाहतूक थांबत नाही ! त्यामुळे अशा कारवाया ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, अशा प्रकारच्या आहेत का, अशी शंका येते !

कोकण रेल्वेमार्गावर ४ डिसेंबरपासून २ अतीजलद गाड्या धावणार

गाडीचे आरक्षण ९ डिसेंबरपासून चालू होणार आहे. जबलपूर-कोईम्बतूर स्पेशल गाडी ५ ते २६ डिसेंबरपर्यंत या कालावधीत धावणार आहे.

सिंधुदुर्गातील सर्व सत्तास्थानांवर भगवा फडकवा ! – अरुण दूधवडकर, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना

कणकवली तालुका शिवसेनेच्या माध्यमातून येथील मातोश्री मंगल कार्यालयात दूधवडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.