स्वप्नात देवता येणार्‍या फिरोज याने केली घरवापसी : ‘राहुल सनातनी’ असे नामकरण !

  • मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील घरवापसीची २२ वी घटना !

  • (घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)

प्रतिकात्मक छायाचित्र

खंडवा (मध्यप्रदेश) – फिरोज या मुसलमान तरुणाने नुकताच विधीवत् हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. त्याचे नाव पालटून ‘राहुल सनातनी’ असे ठेवण्यात आले आहे. येथील महादेवगड मंदिरात पंडित अश्‍विन खेडे यांच्या उपस्थितीत होम-हवन, मंत्रोच्चार यांच्या घोषात शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. गेल्या २ वर्षांतील खंडवा जिल्ह्यातील घरवापसीची ही २२ वी घटना आहे.

खंडवा येथे असलेल्या दुबे कॉलनी येथील रहिवासी फिरोज यांनी सांगितले की, त्यांना वयाच्या १४ व्या वर्षापासून हिंदु धर्मावर पुष्कळ विश्‍वास होता. बजरंगबली आणि ‘खातू श्यामजी’ (भगवान श्रीकृष्ण) त्यांच्या स्वप्नात यायचे अन् हेच त्यांच्या घरवापसीचे मुख्य कारण असल्याचे ते म्हणाले. शुद्धीकरणाला त्यांनी धर्मांतर न म्हणता स्वतःच्या मुळांकडे परतणे म्हणून वर्णन केले आहे.

मंदिराचे काळजीवाहक अशोक पालीवाल म्हणाले की, फिरोजच्या या निर्णयामुळे त्याला त्याचे कुटुंब आणि समाज यांकडून विरोध सहन करावा लागला. यामुळे त्यांना काही काळासाठी इंदूरला जावे लागले. (अभिव्यक्ती आणि धर्म स्वातंत्र्य यांचे कारण देऊन हिंदु धर्माच्या विरोधात बेंबीच्या देठापासून ओरडणारे कथित पुरो(अधो)गामी अशा प्रसंगी कोणत्या बिळात जाऊन लपतात ? – संपादक)

राहुल म्हणाले की, सनातन धर्मात सर्वांच्या कल्याणाची भावना आहे आणि म्हणूनच त्यांनी तो स्वीकारला. सनातन धर्मात आल्यानंतर त्यांना आध्यात्मिक शांती आणि समाधान मिळत असल्याचेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

अद्वितीय अनुभूती आल्याने अहिंदू स्वत:हून हिंदु धर्म स्वीकारतात, तर अन्य पंथीय आमिषे दाखवून अथवा तलवारीच्या जोरावर लोकांचे धर्मांतर करतात !