
मुंबई – सनातन धर्म हा केवळ धर्मच नाही, तर ती जीवनपद्धत आहे. सनातन धर्माने प्रत्येक धर्माचा स्वीकार आणि आदर केला आहे. सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता ही सनातन धर्माची बलस्थाने आहेत. त्यामुळे मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांनी येथे केले. राज्यपाल राधाकृष्णन् यांनी मुंबईतील महाराणी अहिल्यादेवी होळकर मैदान, गोरेगाव येथे चालू असलेल्या हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्याला संबोधित करतांना केले.