कोल्हापूर – विशाळगडावर जे अतिक्रमण झाले, ते पूर्णत: काढलेच गेले पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. अतिक्रमणाकडे ‘अतिक्रमण’ म्हणूनच पाहिले गेले पाहिजे आणि अतिक्रमणाचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये. कुणीही यावे, गडावर येऊन काहीही म्हणावे, हिंदूंना ‘अतिरेकी’ असे संबोधावे, या गोष्टी हिंदू खपवून घेणार नाहीत. आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत आणि हिंदूंवर होणारा कोणताही अन्याय आम्ही सहन करणार नाही, असे मत शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.