चीनला शह देण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवरील ७५ प्रकल्पांचे केले लोकार्पण !
चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेला लागून भारताने ७५ प्रकल्प उभारले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या लडाख दौर्याच्या वेळी या प्रकल्पांचे लोकार्पण केले. २ सहस्र १८० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांत ४४ पूल, २८ रस्ते आणि २ ‘हेलिपॅड’ यांचा समावेश आहे.