‘पितांबरी’चे रवींद्र प्रभुदेसाई ‘डी.लिट्’ पदवीचे मानकरी !

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

मुंबई – पुणे येथील प्रतिष्‍ठित ‘टिळक महाराष्‍ट्र विद्यापीठा’च्‍या वतीने ‘पितांबरी’ आस्‍थापनाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘डी.लिट्’ (डॉक्‍टर ऑफ लिटरेचर) ही पदवी प्रदान करण्‍यात येणार असल्‍याचे सूचित केले आहे. उत्‍पादन आणि विक्री क्षेत्रातील उत्‍कृष्‍ट कामगिरीसाठी ही पदवी देण्‍यात येणार असल्‍याचे विद्यापिठाने कळवले आहे. हा पदवीदान समारंभ ८ मार्च या दिवशी होईल.