
पुणे – विनापरवाना भारतामध्ये वास्तव्य करणारा बांगलादेशी नागरिक एहसान हाफिज शेख याला स्वारगेट पोलिसांनी महर्षीनगरमधून अटक केली आहे. त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पारपत्र, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड जप्त करण्यात आले आहे. एहसान हा १० वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहे. तो कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. वर्ष २०१४ मध्ये त्याने भारतामध्ये घुसखोरी करून तो पुणे येथे वास्तव्यास आला. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे कशी आली ? याची चौकशी करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका :बांगलादेशी घुसखोरांना भारतात प्रवेश मिळवून देणारे, त्यांना साहाय्य करणारे आणि त्यांच्या विरोधात कारवाई न करणारे अशा सर्वांवरच कारवाई होणे आवश्यक ! |