५ ट्रकमधून ४७ गोवंशियांना कोंबले !
पांढरकवडा (यवतमाळ) – येथील नागपूर-भाग्यनगर मार्गावरील तिरंगा धाब्याजवळ ५ ट्रकमधून ४७ गोवंशियांना कोंबून आणलेल्या अवस्थेत सोडवून पोलिसांनी मुक्त केले. पांढरकवडा शहरात ४ अवैध पशूवधगृहे आहेत. तेथे प्रतिदिन ७ – ८ गोवंशियांची हत्या केली जाते. (ही माहिती नागरिकांना आहे, तर पोलीस आणि प्रशासन यांना नाही का ? ते यावर कारवाई का करत नाहीत ? – संपादक) या भागातील नागरिक जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहे.
🐄 💔 47 cattle rescued from slaughter in Pandharkawda, Yavatmal, Maharashtra! 🙏
They were crammed into 5 trucks, 🚚 highlighting the urgent need for effective enforcement of the Cow Slaughter Prohibition Act 📜#GoRaksha गो रक्षाpic.twitter.com/sDTBnKaxkk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 18, 2025
४७ गोवंशियांना नेणारे ८ धर्मांध मुसलमान आणि ६ अन्य असे एकूण १४ आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात येऊन त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात १ कोटी ६१ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (अटक केलेल्यांना कठोर शिक्षा झाल्याविना या प्रकारांना आळा बसणार नाही ! – संपादक)
संपादकीय भूमिकागोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्यानेच अशा प्रकारे प्रकारे गोवंशियांच्या हत्या होत आहेत ! |