महाकुंभक्षेत्री होणार धार्मिक कथा वाचनाचे विशेष कार्यक्रम !

प्रयागराज – ‘स्वामी जगन्नाथ धाम ट्रस्ट, भीमगोडा, हरिद्वार’ आणि ‘श्री कल्की नारायण तीर्थ धाम प्रेरणा पीठ, कर्णावती अहमदाबाद’ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कथांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १७ जानेवारीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत प्रतिदिन दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत. कुंभमेळाक्षेत्रातील सेक्टर २० मध्ये ‘श्री स्वामी जगन्नाथ धाम ट्रस्ट’च्या तंबूत हे कार्यक्रम होणार आहेत.

१७ ते २३ जानेवारी या कालावधीत तपोवन, हरिद्वार येथील प.पू. श्री स्वामी दिव्यानंदजी महाराज भिक्षु हे श्री शिव महापुराण कथा सांगणार आहेत. २४ ते ३० जानेवारी या कालावधीत पोरबंदर, गुजरात येथील प.पू. श्री रमेशभाई ओझा हे श्रीमद् भागवत कथा सांगतील. ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत फैजपूर, महाराष्ट्र येथील सतपंथ आश्रमातील महामंडलेश्वर स्वामी जर्नादन हरि महाराज श्रीरामचरितमानसाची कथा सांगणार आहेत.