मुसलमानांकडून लडाखमध्ये बौद्ध मंदिर बनवण्यास विरोध झाल्याने सहस्रो बौद्ध रस्त्यावर !

प्रतीकात्मक छायाचित्र

कारगिल (लडाख) – येथे मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) आणि धर्मांध मुसलमान यांच्याकडून अनेक वर्षांपासून बौद्धांचे मंदिर बनवण्याला विरोध केला जात आहे. आता या विरोधात बौद्धांनी आवाज उठवायला आरंभ केला असून सहस्रावधी बौद्धांनी यासाठी मोर्चा काढला. यावेळी मठाचा शिलान्यास करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

३१ मे या दिवशी बौद्ध गुरु चोस्कयोंग पाल्गा रिनपोछे यांच्या नेतृत्वाखाली १ सहस्राहून अधिक बौद्धांनी पदयात्रा चालू करत १४ जूनला ते कारगिलला पोचले. यास शिया मुसलमानबहुल असलेल्या कारगिल क्षेत्रातील मुसलमानांनी विरोध दर्शवला. वर्ष १९६९ च्या एका कथित सरकारी आदेशाचा हवाला देऊन मुसलमान पक्ष, ‘येथील विवादित जागा कोणतेही मंदिर बांधण्यास दिली जाऊ शकत नाही’, असे सांगत आहे. बौद्ध पक्षाचे म्हणणे आहे की, १५ मार्च १९६१ या दिवशी जम्मू-काश्मीरच्या सरकारी खात्याने ‘लडाख बौद्ध असोसिएशन’ला बौद्ध मंदिर बांधण्यासाठी भूमी उपलब्ध करून दिली होती, ज्यामध्ये धार्मिक स्थळ उभारण्यास अनुमतीही बहाल करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

‘मुसलमान-बौद्ध भाई भाई’ अशी घोषणा देणार्‍यांना आता यावर काय म्हणायचे आहे ?