मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

नवी मुंबई – मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १४ ते २८ जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले आहेत. यामध्‍ये शासकीय कामकाजात मराठीचा वापर या अनुषंगाने ‘कार्यालयीन टिप्‍पणी आणि मराठी सुलेखन’ या विषयावर महाराष्‍ट्र शासनाचे निवृत्त उपसचिव वसंत चौधरी यांचे व्‍याख्‍यान, २० जानेवारी या दिवशी ‘स्‍वकवितावाचन स्‍पर्धा’, साहित्‍यिक, व्‍याख्‍याते डॉ. महेश केळुसकर यांचे ‘मायबोली अभिजात मराठी’ या विषयावर २१ जानेवारी या दिवशी व्‍याख्‍यान, नवी मुंबई महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्‍यासाठी २२ जानेवारीला ‘मला भावलेले चरित्र  आत्‍मचरित्र’ या विषयावर ‘अभिवाचन स्‍पर्धा’, लेखिका डॉ.निर्मोही फडके यांचा ‘स्‍मरणखुणा : जयवंत दळवी’ हा विशेष कार्यक्रम २४ जानेवारी या दिवशी, तर २८ जानेवारी या दिवशी महापालिका अधिकारी – कर्मचारी यांची ‘अभिजात मराठीची पुढील वाटचाल’ या विषयावर ‘वक्‍तृत्‍व स्‍पर्धा’ आयोजित करण्‍यात आलेली आहे.