बेंगळुरूमध्ये ३ गायींचे आचळे कापले : सय्यद नसरूला अटक !

कर्नाटकातील धर्मांधांची विकृती !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील चामराजपेटेमध्ये ३ गायींची आचळे कापण्याच्या घटनेने मोठी खळबळ उडवली होती. पोलिसांनी हे घृणास्पद कृत्य करणार्‍या धर्मांध आरोपींपैकी सय्यद नसरू (वय ३० वर्षे) याला अटक केली आहे. मैसुरूच्या नंजनगुडु येथे आणि हुब्बळ्ळी येथेही वासरांवर क्रूरपणे आक्रमण केल्याच्या विकृत घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत.

नंजनगुडुमध्ये देवळात नवसासाठी सोडलेल्या वासरावर धर्मांधांनी धारदार शस्त्रांनी आक्रमण करून त्याला घायाळ केले, तसेच हुब्बळ्ळीमध्ये ७ मासांच्या वासराचा मृतदेह पोट फाडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. (विकृतीने ग्रासलेले धर्मांध मुसलमान मुक्या प्राण्यांवरही एवढ्या क्रूरपणे आक्रमण करत आहेत. यातून त्यांच्या नसानसांत हिंदुद्वेष भिनल्याचे लक्षात येते ! हिंदूंनी संघटितपणे त्याला सामारे जाणे, ही काळाची आवश्यकता ठरली आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही ! – संपादक)

घृणास्पद आणि आसुरी कृत्य ! – केंद्रीय मंत्री कुमारस्वामी

केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांनी या घृणास्पद कृत्याचा निषेध केला आहे. ‘हे एक आसुरी कृत्य आहे. या घृणास्पद कृत्यातून राज्यातील काँग्रेस राज्य सरकार आज कोणत्या पातळीवर घसरले आहे, हे दिसून येते’, असे कुमारस्वामी पत्रकारांना सांगितले.