केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये आता केवळ स्थानिकांना सरकारी नोकर्‍या !

अन्य राज्यांकडूनही अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्याचाही सरकारने विचार करून सर्व राज्यांतील स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे !

लडाख (प्रतिकात्मक छायाचित्र)

लेह (लडाख) – केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये आता सरकारी नोकर्‍या स्थानिक लोकांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. लेह येथील सूचना आणि जनसंपर्क विभागाने ट्वीट करून म्हटले आहे की, लडाखने ‘केंद्रशासित प्रदेश रोजगार सेवा भर्ती नियम २०२१’ बनवले आहे. यामध्ये येथील नोकर्‍या स्थानिकांना आरक्षित असणार आहेत.