देशात हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक अहवाल  

देशातील फुटीरतावादी शक्तींचा वाढता प्रभाव हे मोठे आव्हान आहे. जसजसा जनगणनेचा काळ जवळ येत आहे, तसे ‘आम्ही हिंदू नाही’ हे सांगण्यासाठी समुदायांना उद्युक्त केले जात आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.

सूरत (गुजरात) येथील महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर रेखाटण्यात आलेले श्री गणेशाचे चित्र हिंदु संघटनांनी पुसले !

सूरत महानगरपालिकेचे असे चित्र रेखाटण्याचे धाडस होतेच कसे ?

नवसारी (गुजरात) येथे इस्लामविषयी आक्षेपार्ह टिपणी करणार्‍या तरुणाला अटक

व्हॉट्स अ‍ॅप गटातून ही टीपणी करण्यात आल्याची तक्रार जहीर अहमद कासली याने केली होती. या वेळी मुसलमान मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाले होते.

गुजरात विधानसभेत गृहराज्यमंत्र्यांना असंसदीय शब्द वापरून संबोधणारे काँग्रेसचे आमदार निलंबित !

विधानसभेत गावगुंडांप्रमाणे असांस्कृतिक वर्तन करणारे काँग्रेसचे आमदार समाजाला दिशादर्शन काय करणार ?

गुजरातमध्ये गेल्या १४ वर्षांत ६ सहस्र कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा !

केंद्र सरकारने या घोटाळ्याची निष्पक्षपणे चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !

(म्हणे) ‘हा देश पाकिस्तान झाला असून सर्व हिंदूंनी देश सोडावा !’

सामाजिक माध्यमांतून हिजाबला विरोध केल्यावरून कर्नाटकात हिंदूंचे तुकडे तुकडे करण्याची धमकी दिली जाते, तर गुजरातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात पोस्ट करूनही धर्मांधांवर कठोर कारवाई होत नाही !

दोषींना समाजात राहू देणे; म्हणजे नरभक्षक वाघाला उघड्यावर सोडण्यासारखे ! – न्यायालयाची टिप्पणी

जुलै २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या मालिकांमध्ये ५६ लोक ठार झाले होते, तर २०० हून अधिक जण घायाळ झाले होते. या प्रकरणी ३८ दोषींना फाशी, तर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

३८ जणांना फाशी, तर ११ जणांना आजन्म कारावास

कर्णावती (गुजरात) येथे वर्ष २००८ मधील २१ साखळी बाँबस्फोटांचे प्रकरण
बाँबस्फोटासारख्या प्रकरणी १४ वर्षांनंतर निकाल लागणे, हा न्याय नसून अन्यायच म्हणावा लागेल ! अशांमुळेच जिहादी आतंकवादी आणि गुन्हेगार यांचे फावते !

वलसाड (गुजरात) येथे ‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ याविषयावर वक्तृत्व स्पर्धा  

सरकारी आणि खासगी शाळांमधील ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कुसुम विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ‘मारो आदर्श नथुराम गोडसे’ असा विषय होता. यामध्ये पंडित नथुराम गोडसे यांना आदर्श म्हणणार्‍या मुलाला पहिले पारितोषिक देण्यात आले.

गांधीनगर (गुजरात) येथील मशिदींवरील भोंगे बंद करण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात याचिका

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना न्यायालयाकडे अशी मागणी करण्याची आवश्यकता भासू नये ! सरकारनेच अशा भोंग्यांवर कारवाई केली पाहिजे, असे हिंदूंना वाटते !