नवसारी (गुजरात) – इस्लामविषयी आक्षेपार्ह टीपणी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शैलेश सारंग या तरुणाला अटक केली. त्याचा भ्रमणभाष संचही जप्त करण्यात आला आहे. व्हॉट्स अॅप गटातून ही टीपणी करण्यात आल्याची तक्रार जहीर अहमद कासली याने केली होती. या वेळी मुसलमान मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाले होते.
पोलीस उपनिरीक्षक के.एम्. वसावा यांनी सांगितले की, आम्ही शांतता राखण्यासाठी मुसलमान नेत्यांशी चर्चा करत आहोत. तरुणाच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. (हिंदु धर्माचा अवमान करणार्यांवर पोलीस कधी तत्परतेने कारवाई करतात का ? हिंदूंच्या नेत्यांशी कधी याविषयी चर्चा करतात का ? – संपादक)