आपत्काळात तरून जाण्यासाठी भक्त होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्या आपत्काळास प्रारंभ झाला आहे. या आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताची भक्ती करणे आवश्यक आहे. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून शुद्ध मनाने भक्ती म्हणजेच साधना केली पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

फोंडा पोलीस ठाण्यात धर्मांधाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार नोंद

पिळये, धारबांदोडा येथील एक अल्पवयीन मुलगी गायब झाल्यासंबंधीची तक्रार ७ जानेवारी या दिवशी फोंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आरोपी आणि गायब झालेली मुलगी यांचा पोलीस शोध घेत असून अजून त्याविषयी काही माहिती मिळालेली नाही.

शेळ-मेळावली येथे तणावपूर्ण शांतता : २१ जणांवर गंभीर गुन्हे प्रविष्ट

मेळावली येथे ६ जानेवारी या दिवशी झालेल्या हिंसक आंदोलनावरून पोलिसांनी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे नेते आदी मिळून एकूण २१ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे प्रविष्ट केले आहेत, तर गुन्हे अन्वेषण विभागाने परशुराम सेनेचे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांना अटक केली आहे.

राजकारण करण्यासाठी शेळ-मेळावली प्रश्‍नाचे भांडवल ! – नितीन फळदेसाई, अध्यक्ष, गोवा सुरक्षा मंच

शेळ-मेळावली येथे मुळात समस्याच नाही. सोडवायचाच असल्यास चुटकीसरशी सुटणारा हा प्रश्‍न आहे; मात्र राजकारण करण्यासाठी या प्रश्‍नाचे भांडवल करण्यात येत असल्याचा आरोप श्री. फळदेसाई यांनी केला.

(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘बाबरी’सारखे वातावरण निर्माण करत आहेत !’

सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी देवीच्या स्थानिक भक्तगणांनी पूजाअर्चा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम केला होता. हा कार्यक्रम चालू असतांना स्थानिक ख्रिस्त्यांनी ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ही चर्चची भूमी असल्याचा दावा करून पोलिसांवर दबाव आणत भक्तांचा कार्यक्रम अर्ध्यावरच बंद पाडला.

उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर बिनविरोध निवड

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी कार्तिक कुडणेकर, तर उपाध्यक्षपदी दिक्षा खानोलकर यांची, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी सुवर्णा तेंडुलकर यांची, तर उपाध्यक्षपदी कुशाली वेळीप यांची निवड झाली आहे.

कोरोना लसीची आज पुन्हा रंगीत तालीम

राज्यात दुसर्‍यांदा कोरोना लसीची रंगीत तालीम ८ जानेवारीला घेण्यात येणार आहे. वाळपई, कांदोळी, म्हापसा, केपे, चिंचिणी आणि मडगाव येथील शासकीय आरोग्य केंद्रे, तसेच मणिपाल आणि व्हिक्टर रुग्णालये येथे ही रंगीत तालीम होणार आहे.

ख्रिस्ती नववर्षानिमित्त आलेल्या पर्यटकांनी समुद्रकिनार्‍यांवर फेकलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांच्या काचा लागल्याने अनेकांना गंभीर इजा

‘दृष्टी मरिन’ यांनी दिलेल्या माहितीनुसार फुटलेल्या बाटल्यांवर पाय पडल्याने पायाला दुखापत होण्याच्या मागील काही दिवसांत १० हून अधिक घटना घडल्या आहेत. स्थानिक मासेमार आणि ‘वॉटरस्पोर्ट’चे कर्मचारी यांनाही काच लागल्याने दुखापत झाली आहे.

कुर्टी, फोंडा येथील नुरानी मशिदीतून होणार्‍या ध्वनीप्रदूषणावर कारवाई करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुरानी मशिदीला बजावली गेली नोटीस : ध्वनीप्रदूषण होत आहे, हे न्यायालयाने का सांगावे लागते ? पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना मशिदीतून दिवसातून ५ वेळा होणारे ध्वनीप्रदूषण ऐकू येत नाही का ?

भूसर्वेक्षणास विरोध करणार्‍या मेळावली ग्रामस्थांवर पोलिसांचा लाठीहल्ला आणि अश्रूधुराचा वापर : ग्रामस्थांकडूनही दगडफेक

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाला ६ जानेवारी या दिवशी हिंसक वळण लागले. प्रस्तावित आयआयटी प्रकल्पासाठीच्या भूमीच्या सर्वेक्षणाचे काम ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे ६ जानेवारी या दुसर्‍या दिवशी भूसर्वेक्षण अधिकार्‍यांना बंद करावे लागले.