कोरोनाविषयक चाचण्यांच्या दराविषयी अधिसूचना लागू

कोरोनासंदर्भातील वैद्यकीय चाचण्यांचे दर शासनाने अधिसूचनेद्वारे घोषित केले आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयांसाठी हे दर समान असतील. पूर्ण स्वयंचलित ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणीसाठी २ सहस्र ४३० रुपये आकारले जातील.

मेळावली येथील आय.आय.टी. प्रकल्पाच्या भूसर्वेक्षणाचे काम उद्या चालू रहाणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मेळावली येथे आय.आय.टी. प्रकल्प उभारण्याविषयी गोवा शासन ठाम आहे. या प्रकल्पाला तेथील स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार येथील अंदाजे १७ ग्रामस्थ कुटुंबीय प्रकल्पासाठीच्या सरकारी भूमीवर लागवड करतात.

नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे आज उद्घाटन

गोवा मनोरंजन संस्थेचे नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे उद्घाटन ११ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता संस्थेच्या संकुलात राज्याचे मुख्यमंत्री तथा गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

पेडणे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद, दोघांना अटक

तालुक्यातील दांडोवाडो, मांद्रे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

शंखवाळी तीर्थक्षेत्री पूर्वी श्री विजयादुर्गा मंदिर असलेल्या वारसास्थळी यंदा पुन्हा ख्रिस्त्यांकडून अनुमती न घेताच फेस्ताचे आयोजन !

बहुसंख्य हिंदूंच्या देशातील अल्पसंख्यांकांची अरेरावी अतीसहिष्णु हिंदू किती दिवस सहन करणार आहेत ?

गोव्यात होणार्‍या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ऑनलाईन नावनोंदणी चालू

गोव्यात १६ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत होणार्‍या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘ऑनलाईन’ नावनोंदणी चालू झाली आहे. या वेळी पहिल्यांदाच या महोत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेणे आणि ऑनलाईन सहभाग घेणे, अशा पद्धतीने सहभागी होता येईल.

प्रगतीचे स्थान टिकवून ठेवणे, हे गोव्यापुढे आव्हान !  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

‘बरीच प्रगती साध्य केल्यानंतर त्यात घसरण न होऊ देता आपले स्थान टिकवून ठेवणे, हे गोव्यापुढे आव्हान आहे, असे वक्तव्य भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. पर्वरी येथेे गोवा विधीकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आय.आय.टी. प्रकल्पासंबंधी मेळावली ग्रामस्थांशी चर्चा करण्यास सिद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

शासनाकडून नियोजित आय.आय.टी. प्रकल्पासंबंधी शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांशी चर्चा करण्यास मी सिद्ध आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ९ जानेवारीला पत्रकारांशी बोलतांना केले.

शैलेंद्र वेलिंगकर यांच्यावरील अत्याचार, हा भाजपचा माझ्या विरोधातील सूडचक्राचा भाग ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

या मारहाणीत शैलेंद्रचा ‘इअरड्रम’ फाटला असून डाव्या कानाने ऐकू येणे बंद झाले आहे. त्याला हेतूपुरस्सर सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात न तपासता, म्हापशाच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

शेळ-मेळावली येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा गोवा सुरक्षा मंचकडून निषेध

शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा गोवा सुरक्षा मंचकडून ‘गोवा शासनाने या आंदोलकांविरुद्ध केलेली कृती अन्यायकारक आणि लोकशाहीविरोधी आहे’, या शब्दांत निषेध करण्यात आला आहे.