मतदारसूचीतून यादव आणि मुसलमान यांची नावे काढून टाकण्यात आल्याचे पुरावे द्या !

निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना नोटीस बजावली आहे. यावर त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्याकडे आली टि्वटरची मालकी !

मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांच्यासह तिघांची हकालपट्टी

‘एक देश, एक पोलीस गणवेश’, यावर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांनी चर्चा करावी ! – पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

ते ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित करतांना बोलत होते.

‘न्यूज १८ इंडिया’ या वृत्तवाहिनीला ५० सहस्र रुपयांचा दंड

‘न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (‘एन्.बी.डी.एस्.ए.’ने) ‘न्यूज १८ इंडिया’ या वृत्तवाहिनीला चर्चासत्रात सहभागी हिजाब समर्थक मुसलमानांना ‘अल् कायदा’ या आतंकवादी संघटनेचे समर्थक असल्याचे म्हटल्याने ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कोणत्याही पक्षाने परमाणु पर्यायाचा विचार करू नये ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांच्याशी दूरभाषवर नुकतीच चर्चा केली. रशिया-युक्रेन संघर्षासंदर्भात भूमिका स्पष्ट करतांना सिंह म्हणाले की, कोणत्याही पक्षाने परमाणु पर्यायाचा विचार करू नये.

अंदमानच्या माजी मुख्य सचिवांच्या निवासस्थानी २० महिलांना नेण्यात आल्याची माहिती

अंदमान आणि निकोबारमध्ये लैंगिक शोषणाच्या बदल्यात काही महिलांना नोकरी देण्यात आल्याचा घोटाळा समोर आला आहे. अंदमान आणि निकोबारचे माजी मुख्य सचिव जितेंद्र नरेन अन् कामगार आयुक्त आर्.एल्. ऋषी यांच्याविरोधात २१ वर्षीय महिलेने सामूहिक बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांचे आरोप केले आहेत.

वसंतकुंज स्मशानभूमीच्या स्थलांतराच्या देहली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती

‘जर प्रत्येक रहिवासी संघटनेने स्मशानभूमी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला, तर शहराच्या हद्दीत एकही स्मशानभूमी शिल्लक रहाणार नाही’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मला सगळ्यांची बायका-मुले आणि घरे ठाऊक आहेत ! – ‘झोमॅटो’चा ‘डिलिव्हरी बॉय’ नदीम याची धमकी

असे धर्मांध नोकरी करण्याच्या नावाखाली लोकांची कशी माहिती गोळा करतात, हेच यावरून लक्षात येते !  या माहितीचा ते वापर लव्ह जिहादसाठी  करत नसतील कशावरून ?

अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्ती बांगलादेशाची पंतप्रधान झाल्यास आम्ही स्वीकारणार नाही !

अन्य देशामध्ये जर तेथील अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्ती पंतप्रधान झाली, तर आम्ही टाळ्या वाजवतो; परंतु जर अल्पसंख्यांक समुदायातील कुणी व्यक्ती आमच्या देशाची (बांगलादेशाची) पंतप्रधान झाली, तर आम्ही ते स्वीकारू शकत नाही, – तस्लिमा नसरीन