अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्ती बांगलादेशाची पंतप्रधान झाल्यास आम्ही स्वीकारणार नाही !

प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांचे उपरोधिक ट्वीट

लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – अन्य देशामध्ये जर तेथील अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्ती पंतप्रधान झाली, तर आम्ही टाळ्या वाजवतो; परंतु जर अल्पसंख्यांक समुदायातील कुणी व्यक्ती आमच्या देशाची (बांगलादेशाची) पंतप्रधान झाली, तर आम्ही ते स्वीकारू शकत नाही, असे उपरोधिक ट्वीट मूळच्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याच्या घटनेवर त्यांनी हे ट्वीट केले आहे. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांची विशेषतः हिंदूंची स्थिती अत्यंत दयनीय आहे. तेथे प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत असतात.